Mon. Jan 24th, 2022

तुमचं मत तुम्हाला मजबूत बनवणारं शस्त्र – प्रियंका गांधी

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने गुजरातच्या गांधीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेत पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी भाषण केले. प्रियंका गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. प्रियंका गांधी यांनी अनेक समस्यांवर भाषण केले. काही दिवसांतच लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे कॉंग्रेसने भाजपच्या अनेक मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित केल्याचे समजते आहे.

प्रियंका गांधी काय म्हणाल्या ?

प्रियंका गांधी यांची पहिली जाहीर सभा आहे.

रोजगार, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे मुद्दे अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रियंका गांधी यांनी भाषण केले.

तसेच निवडणुका जवळ आल्यामुळे जनतेने विचार करून निर्णय घ्यावा.

मोदींनी दिलेल्या आश्वासनांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली.

जनतेच्या खात्यात १५ लाख रूपये, २ कोटी रोजगार अशा मुद्द्यांवर प्रियंका गांधी यांनी टीका केली.

देशाच्या विकासाठी काम करा असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

तुमचं मत तुम्हाला मजबूत बनवणारं शस्त्र आहे, असा सल्ला जनतेला दिला.

काय म्हणाले राहुल गांधी ?

देशात सर्वत्र अराजक माजलं आहे

देशाच्या घटनात्मक संस्थांवर आक्रमण केले जात आहे.

लोकांमध्ये द्वेष पसरवण्याच काम सुरू आहे.

देशात 45 वर्षानंतर बेरोजगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

मोदींनी 15 उद्योगपतींची कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही.

अर्थमंत्री म्हणतात शेतकरी कर्जमाफी आमची पॉलीसी नाही. आम्ही तिन्ही राज्यात कर्जमाफी करुन दाखवली.

10 दिवसांत आम्ही राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगढमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली काँग्रेस खोटं बोलते, असा मोदींनी प्रचार केला.

मात्र आम्ही कर्जमाफी केली आहे असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी नोटाबंदीवरही टीका केली. नोटबंदीमुळे गुजरातमधील लघुउद्योगांचा कणा मोडला.

छोट्या व्यापाऱ्यांचा रोजगार बुडवला आहे.

पाकिस्तानसोबत चकमक सुरु असतांना मोदींनी देशातली पाच विमानतळं उद्योगपतींचा खिशात घातली.

आम्ही आश्वासन देतो, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफ करणार.

लघू उद्योजक, गरीबांना आर्थिक मदत करणार.

देशभरात गरिबांना निश्चित किमान वेतन लागू करणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *