Mon. Jul 13th, 2020

#Article370 राहुल गांधी 24 ऑगस्ट रोजी कश्मीरला रवाना!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उद्या जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला भेट देणार. राहुल यांच्यासह  9 विरोधी नेतेही श्रीनगरला जाणार आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा जम्मू काश्मीरला रवाना होतील.

यावेळी राहुल यांच्यासह सर्व नेते तेथील परिस्थितीचा आढावा घेतील आणि स्थानिक नेत्यांव्यतिरिक्त लोकांची भेट घेतील.

यापूर्वी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काश्मीर बोलावण्याच्या प्रस्तावाला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेत्यांच्या पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *