Sun. Sep 19th, 2021

आता राहुल गांधींवरही बायोपीक; टिझर पाहिलात का ?

निवडणूकींचा सीझन सध्या चित्रपट सृष्टीतही सुरू असल्याने ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटानंतर आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही बायोपीक येणार आहे. ‘माय नेम इज रागा’ असे या बायोपीकचे नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच काही दिवसातच या चित्रपटाचा टिझरही रिलीझ करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला कधी येणार याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं या बायोपीकमध्ये काय असणार ?

या वर्षी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत.

निवडणुक तोंडावर असल्यामुळे आपला प्रचार करण्यात सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.

मात्र यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट सृष्टीचा वापर करण्यात आला आहे.

मात्र ही खेळी राजकीय मैदानात नाही,तर कलाकृतींच्या माध्यमातून जनतेसमोर आली आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा  ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा जीवनपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला.

तर 25 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी मध्ये प्रदर्शित झाला.

काही दिवसांपूर्वी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली.

हा चित्रपट 23 भाषांमध्ये प्रदर्षित होईल.

या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू होत नाही, तर लगेच त्यांचे विरोधक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही बायोपीकचा टिझर आला आहे.

फक्त 4.3 सेकंदच्या या टिझरमधून राहुल यांच्या बालपणापासून ते काँग्रेस अध्यक्ष होण्यापर्यंतची झलक पाहायला मिळते.

या  चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कहानीपासून होते आणि याचा शेवट 2019 च्या लोकसभा निवडणूकांच्या वातावरणात होते.

रूपेश पॉल या पत्रकाराने या सिनेमाची पटकथा लिहीली आहे, तर यामध्ये राहुल यांचे बालपण,अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय आयुष्याचे वर्णन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *