Tue. Apr 20th, 2021

Budget 2020 : हे बजेट गोंधळात टाकणारं- राहुल गांधी

लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पामध्ये कररचनेला आणखी क्लिष्ट केलं आहे. त्यामुळे हे बजेट गोंधळात टाकणारं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi Reacts on Budget2020)

अर्थमंत्री सलग अडीच तासांपेक्षा जास्त बोलल्या. कदाचित हे भाषण इतिहासातील सर्वात मोठं भाषणं होतं. मात्र त्यातूनही अर्थसंकल्पाबाबत पुरेशी सुस्पष्टता आलेली नाही.

सध्या देशासमोर रोजगार आणि अर्थव्यवस्थेची स्थिती या दोन प्रमुख समस्या आहेत.

परंतु या अर्थसंकल्पातून तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचं राहूल गांधी म्हणाले.

“सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची मोदी सरकारकडून घोर निराशा”

सरकारच्या भूमिकेचं दर्शन या अर्थसंकल्पातून होतं. मात्र हा अर्थसंकल्प फुसका बार असल्याचं त्यांनी म्हटलं.

अधिक वाचा : BudgetLive : सर्वसामान्यांना दिलासा, ‘अशी’ असेल नवी करप्रणाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *