Wed. Jun 23rd, 2021

राहुल गांधींचा राजीनाम्याचा निर्णय धाडसी – प्रियंका गांधी

Rahul Gandhi and his sister Priyanka Gandhi during an event organised by Rajiv Gandhi Foundation at Jawahar Bhavan. *** Local Caption *** Rahul Gandhi and his sister Priyanka Gandhi during an event organised by Rajiv Gandhi Foundation at Jawahar Bhavan. Express photo by Renuka Puri.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. राहुल गांधींनी पक्षाला चार पानी राजीनामा लिहून आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची बहिण प्रियंका गांधी यांनी समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय धाडसी असल्याचे प्रियंका गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी ?

राहुल गांधी यांनी बुधवारी चार पानाचा राजीनामा लिहून पक्षाकडे सोपवला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटलं होतं.

राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय धाडसी असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटलं.

राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर माझा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजीनामा देण्याचे कारण काय ?

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी पंतप्रधानांना चौकीदार चोर म्हणायला नको होते.

त्यामुळे कॉंग्रेसचा पराभव झाल्याचे अनेक कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले.

म्हणून पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल गांधी यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटलं.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं यासाठी त्यांना वारंवार विनंती केली जात होती.

त्यांचा राजीनामाही स्वीकारला जात नव्हता.

मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते.

त्यांनी आज अधिकृतरीत्या आपण पक्षाध्यक्ष नसल्याचं म्हणत नवा पक्षाध्यक्ष गांधी – नेहरू परिवारातील नसावा असंही म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *