Mon. Mar 30th, 2020

महाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस राहुल गांधींकडून चार वाजता समारोपाचं भाषण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेसच्या महाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे राहुल गांधी आज संध्याकाळी चार वाजता महाअधिवेशनात समारोपाचं भाषण करणार आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून प्रमुख नेत्यांसह 15 हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्लीत या महाअधिवेशनासाठी उपस्थित आहेत.

डिसेंबर महिन्यात राहुल गांधींनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर काँग्रेसचे हे पहिलेच महाअधिवेशन आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. काँग्रेसच्या महाअधिवेशनाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठं महत्त्वं आहेच, त्याचसोबत अनेक दिग्गज अध्यक्षांनी या व्यासपीठावरुन काँग्रेसची वाटचाल मांडली आहे. अशा व्यासपीठावरुन पहिल्यांदाच राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

भाजपविरोधातील लढाई, देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मुद्दे, त्याचसोबत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न इत्यादी अनेक मुद्दे राहुल गांधी यांच्या भाषणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राहुल गांधी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर बोलतील, हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *