राहुल महाजनची ‘या’ माॅडेलसोबत लगीनगाठ

नेहमीच कोणत्या न कोणत्या वादात राहणारा राहुल महाजन मुळच्या कोल्हापुरी अमृता माने या मुलीच्या प्रेमात पडला असून तो लवकरच तिसºयांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा जोर धरून होती मात्र राहूल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला परंतू लग्न केले ते दुसऱ्याचं माॅडेलसोबत…
नताल्या लिना असे या मॉडेलचे नाव असून ती मुळची कझाकस्थानमधील आहेत. मुंबईतील मलबार हिलमधील एका देवळात अगदी जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत राहुलने लग्न केले.
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राहुलने ‘राहुल दुल्हनियाँं ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डिम्पी गांगुली हिच्या गळ्यात वरमाला टाकली होती. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर चारच महिन्यात राहुल शारिरीक छळ करीत असल्याची तक्रार डिम्पीने केली होती. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
नताल्या आणि राहुल याची काही कॉमन फ्रेंड्च्या मार्फत मैत्री झाली होती. ते दोघे गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून तीन महिन्यांपासून नात्यात आहेत. गेल्याच महिन्यात राहुलने तिला लग्नासाठी विचारले.
यावर राहूल महाजन म्हणतात –
“माझी दोन्ही लग्नं खूप घाईघाईत झाली. खरे तर श्वेता आणि डिम्पी दोघेही व्यक्ती म्हणून खूप चांगल्या आहेत. पण आम्ही एकमेकांसाठी योग्य नव्हतो असे मला नेहमी वाटते. त्यामुळे कोणत्याही नात्यात अडकायचे नाही असेच मी ठरवले होते. पण नताल्या ही माझी जोडीदार म्हणून अगदी योग्य असल्याचे मला जाणवले. आम्ही लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचे असे सुरुवातीलाच ठरवले होते. एवढेच नव्हे तर माझ्या या आधीच्या नात्यांमुळे लोकांना चर्चेचा एक विषय मिळू शकतो आणि त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नाबाबत सगळ्यांना सांगायचे असे मी ठरवले होते. पण ते शक्य झाले नाही. नताल्या ही हिंदू नसली तरी तिला आपले रितीरिवाज खूप आवडतात. तिने मंगळसूत्र देखील घालण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्याची नताल्यासोबत मी एक नवी सुरुवात करत आहे.”