Tue. Aug 9th, 2022

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. भाजपाचे राहुल नार्वेकर यांची नवे विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून राजन साळवी यांच्यात चांगलीच लढत रंगली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी १६४ मतांनी विजय मिळवत विधानसभा अध्यक्षपदी स्थान मिळवले आहे. तर राजन साळवी यांना १०७ मते पडली असून त्यांचा पराभव झाला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिसवेनेकडून पक्षादेश जारी करण्यात आला होता. मात्र, बंडखोर आमदारांनी शिवसेनेने जाहीर केलेला पक्षादेश झुगारून राहुल नार्वेकर यांना पारड्यात मतदान केले. तसेच मनसे आणि बहुजन विकास आघाडीनेही नार्वेकरांना पाठिंबा दर्शवला. तर एमआयएमने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.

सासरे सभापती, जावई विधानसभेचे अध्यक्ष

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सर्वोच्च पदी एकाच कुटुंबातील सदस्य विराजमान आहेत. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. तर, आता राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

कोण आहेत राहुल नार्वेकर

  • विधानपरिषद सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निबाळकर यांचे जावई
  • कुलाबा मतदार संघाचे आमदार
  • २०१४ मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
  • २०१४ मध्ये मावळ मतदारसंघातून पराभव
  • २०१६ मध्ये राज्यपालांमार्फत विधानपरिषदेवर नेमणूक
  • २०१९ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.