Tue. Sep 27th, 2022

बिगबॉस फेम राहुल वैद्य प्रेयसी दिशा परमारशी करणार लग्न

मुंबई : बिग बॉसमुळे अल्पावधीतच प्रसिध्द झालेला गायक राहुल वैद्य हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राहुल हा प्रेयसी दिशा परमारशी लग्न करणार असल्याचं समजत आहे. जुलै महिन्यात ते दोघेही लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा ही सोशल मीडियावर सुरू होती. त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना याबाबत माहिती दिली असून राहुल आणि दिशा १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. ”आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने हे क्षण शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. प्रेमाचा हा आमच्या आयुष्यातील नवा अध्याय आहे. आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” असं राहुल आणि दिशाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसेचं राहुल आणि दिशाला अगदी साध्या आणि खाजगी स्वरुपात लग्न सोहळा पार पडावा अशी इच्छा आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वात राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.