अभिनेता राहुल वोहराला न्याय मिळावा यासाठी पत्नीने व्हिडिओ केला व्हायरल

मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर हा देशात सुरूच आहे. या व्हायरल पासून कसं वाचल्या जाऊ याचा प्रत्येकजण विचार करत आहे. देशात बेड्स, ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची ही लढाई दिवसेंदिवस आणखी जास्त भयानक होत आहे असे देशातील कोरोना रुग्णाच्या आकड्यांवरून लक्षात येते. कोरोना हा फक्त सर्वसामान्यांनांचं नाही तर अनेक सेलिब्रिटींना देखील झाला आहे. काही सेलेब्रिटी कोरोनातून रिकव्हर होऊन घरी परत आले आहेत तर काही हे कायमचे जग सोडून गेले आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता राहुल वोहराला न्याय हा मिळाला पाहिजे असे अनेक नेटकरी म्हणत आहे. राहुलचा(Rahul Vohra)कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राहुलच्या पत्नी एक राहुलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात दिसून येत आहे की राहुला श्वास घेण्यास अडचण जात आहे.

राहुलच्या पत्नीने आरोप केला आहे की, रूग्णालयात उपचार हवे तसे न झाल्यामुळे माझ्या पतीचं निधन झालं. या घटनेला राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जबाबदार आहे. राहुलच्या पत्नीचं नाव ज्योती तिवारी असं आहे. ज्योती तिच्या पतीचा एक शेवटचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. व्हीडिओमध्ये राहुलने ऑक्सिजन मास्क काढत उपचारा दरम्यान आलेल्या अडचणींचा खुलासा केला आहे. ‘आज ऑक्सिजनची गरज फार मोठी आहे. ‘ नर्सला सांगितल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचं देखील राहुलने व्हीडिओमध्ये सांगितलं आहे. व्हीडिओ पोस्ट करत ज्योतीने तिच्या पतीसाठी न्याय मागितला आहे. ‘प्रत्येक राहुलसाठी न्याय. माझा राहुल गेला. पण तो कसा गेला ते कोणाला माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर दिल्ली. अशी वागणूक दिली जाते…’ असं ज्योतीने पोस्ट म्हटलं आहे. शिवाय राहुलला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

Exit mobile version