एपीएमसीमध्ये चार शीतगृहांवर धाड

एपीएमसी प्रशासनाने मार्केटमध्ये मॅफ्को हद्दीतील चार शीतगृहांव धाडी टाकल्या. या मार्केटमध्ये दररोज अवैध व्यापारातून तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल होत असे. त्यामुळे एपीएमसी दक्षता पथकाने कारवाई करत एपीएमसीमध्ये चार शीतगृहांवर धाड टाकली आहे.
अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफ्को हद्दीतील शीतगृहांमधून परस्पर व्यापार सुरू केला होता. त्यामुळे हा अवैध व्यापार रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफ्को हद्दीतील चार शीतगृहांवर धाडी टाकल्या.
सकाळी संचालकांनी तसेच सायंकाळी एपीएमसी दक्षता पथकाने कारवाईला सुरुवात केली. दररोज एपीएमसीमधील अवैध व्यापारातुन तब्बल २० कोटींची उलाढाल होत असे. अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांची ही करमुक्त उलाढाल वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे दक्षतापथकाने एकूण चार शीतगृहांवर धाडी टाकल्या.