रायगडमध्ये दिवाळीला उत्साहात प्रारंभ
कोरोना महामारीच टेंशन विसरत रायगडमध्ये उत्साहात दिवाळीला प्रारंभ झाला.

कोरोना महामारीमध्ये टेंशन विसरत रायगडमध्ये उत्साहात दिवाळीला प्रारंभ झाला. आज अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस, नरक चर्तुदशीचा दिवस या निमित्ताने रायगडमध्ये ठिक ठिकाणी रस्त्यावर आंघोळ करण्याची परंपरा आहे.
श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला या पराक्रमाच प्रतिक म्हणून आजच्या दिवशी चिराटू नावाच कडु फळ अभ्यंग स्नानाच्या वेळी पायाखाली चिरडण्या परंपरा रायगडमध्ये आहे. घरांना रोशनाई, फटाकांच अतिषबाजी करीत आज रायगडमध्ये दिवाळीला प्रारंभ झाला.