Fri. Jan 21st, 2022

टकमक टोकावरुन तरुण-तरुणीची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

किल्ले रायगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या दोन तरुण-तरुणीचा टकमक टोकावरुन खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना

शनिवारी दुपारी घडली आहे. या दुर्घटनेत लता रामा मुकणे (१५), सोनू जगताप (२०) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

राहुल सुरेश मुकणे, लता रामा मुकणे आणि सोनू जगताप हे तिघे पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगडवर गेले होते.

रायगडावरील ऐतिहासिक स्थळे पाहत असताना दुपारी तीनच्या सुमारास तिघेही टकमक टोकाजवळ आले.

 

 

सोनू जगताप आणि लता मुकणे या दोघांनी टकमक टोकाच्या अगदी कडेला उभे राहून, राहूल याला मोबाईल मधील कॅमेराने दोघांचे फोटो घेण्यास सांगितले.

फोटो काढल्यानंतर आम्ही जातो असं सांगत त्या दोघांनी टकमक टोकावरुन अचानक उडी मारून आत्महत्या केली आहे.

दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच महाड तालुका पोलीस, स्थानिक ग्रामस्थ व ट्रेकर्स किल्ले रायगडावर दाखल झाले असून कोसळलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *