Fri. Sep 30th, 2022

रायगड जिल्हा बनला महाराष्ट्राची ऑक्सिजन राजधानी

रायगड: कोरोना काळात देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. महाराष्ट्रात अनेक भागात ऑक्सिजन कमतरता दिसून येत होती. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे ऑक्सिजन सिलेंडर मिळालं का? अशा आशायची पोस्ट करतांना दिसत होते. मात्र आता जवळजवळ महाराष्ट्राने ऑक्सिजनच्या संकटावर मात केल्याचं चित्र दिसून येत आहे. सद्य स्थितीमध्ये रायगड जिल्हा ऑक्सिजन उत्पादनाची राजधानी बनला आहे. रायगड जिल्ह्याने मागच्या वर्षभरात ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता ४० टक्क्याने वाढवली आहे. सध्या दर दिवसाला रायगडमध्ये ६५० टन ऑक्सिजनचे उत्पादन सुरु आहे. रायगड जिल्ह्याला दर दिवसाला स्वत:ला ३० टन ऑक्सिजनची गरज लागते. तसेच रायगड जिल्हा हा मुंबई आणि मुंबई महानगर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, बीड, जालना आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांची ऑक्सिजन गरज भागवत आहे. मुंबईला दर दिवसाला २४० टन ऑक्सिजनची गरज लागते. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन टाक्या आहेत, त्यातून १८० टन ऑक्सिजन वापरला जातो. उर्वरित ६० टनांचा जम्बो आणि ड्युरा सिलिंडर्समधून पुरवठा होतो. रायगडमधुन हे सिलिंडर्स येतात. पहिल्या लाटेच्यावेळी ४०० टन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करण्याची रायगडची क्षमता होती. दुसऱ्या लाटेमध्ये ही क्षमता प्रतिदिन ६५० टनांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘आम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या ऑक्सिजन प्लांटचेच उत्पादन वाढवलेले नाही, तर इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचे वेगाने मेडिकल ऑक्सिजनमध्ये रुपांतर केले’, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात पेण, डोळवी, माणगाव आणि तळाजो या भागात मुख्यत्वे ऑक्सिजन उत्पादन चालते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.