Wed. Jan 19th, 2022

एसटी चालकाचे धाडस बेतले असते प्रवाशांच्या जीवावर

रायगड : रायगड जिल्ह्यात सोमवारीमुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून . महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील नागेशवरी बंधा-यावरून पाणी वहात होते. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला.
अशावेळी या बंधाऱ्याच्या शेजारी असलेल्या पुलावरून गाडी पलीकडे नेण्याचे धाडस एस टी चालकाने दाखवले. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे सुदैवाने बंधारा पार करून गाडी सुखरूप पलीकडे नेण्यात चालक यशस्वी ठरला. अन्यथा चालकाचे हे धाडस त्याच्यासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकले असते. दरम्यान , या संदर्भात रायगड एसटीच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याशी संपर्क साधला असता ,ही बस पुणे विभागाची होती.
एस टी मध्ये किती प्रवासी होते, रिकामी होती हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *