Tue. Dec 7th, 2021

राष्ट्रवादीच्या नेत्याला गंडवणारा भोंदूबाबा गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कामगार नेते विजय कांबळेंना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे.

उदयसिंग प्रतापराव चव्हाण उर्फ महाराज असं या भोंदूबाबाचं नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या बाबाने केंद्रातील तसेच राज्यातील महामंडळावर वर्णी लावून देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय कांबळे यांच्याकडून 1 कोटी 70 लाख रूपये घेतले होते.

मात्र, पैसे देऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी महामंडळावर वर्णी न लागल्याने आपली शुद्ध फसवणूक झाल्याचं विजय कांबळेंच्या लक्षात आले. सहा महिन्यापूर्वी कामोठे पोलीस ठाण्यात उदयसिंगविरोधात तक्रार दाखल केली होती.

अखेर गंडा घालणाऱ्या या भोंदूबाबाला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *