Jaimaharashtra news

एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात बाळ; बाल रुग्णांना वाऱ्यावर सोडू नर्स मोबाईलवर चॅटींगमध्ये बिझी

जय महाराष्ट्र न्यूज, अलिबाग

 

ढिसाळ आरोग्य यंत्रणेचा आणखी एक नमुना आता समोर आला आहे. बाल रुग्णांना वाऱ्यावर सोडून एक परिचारीका मोबाईलवर चॅटींग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

झाला आहे.

 

जिवीता वाघमारे असं या नर्सचं नाव आहे. आलिबागमधील जिल्ही रुग्णालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ती ड्यूटीवर होती. त्यावेळी कामाकडे दुर्लक्ष करून ती

मोबाईल चॅटींग करत होती.

 

त्यावेळी लहान मुलांच्या नातेवाईकांनी बाळांबद्दल विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तर देत होती. त्यावेळी संतापलेल्या नातलगांनी तिचा व्हिडीओ तयार केला. अशा

निष्काळजी नर्सवर आणि त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी नातलग करतय आहेत. 

Exit mobile version