पर्यटकांना आकर्षित करतोय रायगडमधील झुलता पूल
जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
पावसाळ्यात संपूर्ण कोकण निर्सग समृद्धीनं बहरला आहे. पर्यटकांना इथला निर्सग नेहमीच आकर्षित करतो.
अनेक धबधबे, धरणं, तलाव नेहमीच पर्यटकांनी गजबजून जातात. अशातच रायगडमधील झुलता पूल पर्यटकांसाठी एक निराळंच आकर्षण वाटत आहे.
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात वाकण गाव वसल आहे. तिथंच हा हवेच्या तरंगावर झुलणारा लोखंडी पूल पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतोय.
हजारो मीटर खोलीच्या दरीवर हा झूलता पूल बांधला गेला आहे. पर्यटनातील थराराचा अनुभव घेण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.