Jaimaharashtra news

मुंबईच्या 55 विद्यार्थ्यांसाठी रायगडचे पोलीस ठरले देवदूत

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

सध्या सर्वत्रच पावसाळी सहलीचे पेव फुटू लागले आहेत आणि या सहलींमध्ये तरुणाई नेहमीच अग्रेसर असते.

 

मात्र, सहलीचा आनंद जीवावरही बेतू शकतो याचं भान त्यांना उरत नाही. अशीच काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली ती रायगडच्या माणगाव तालुक्यात.

 

सहलीसाठी देवकुंड भागातील नदीपात्रावरील धबधब्यावर गेलेल्या 55 विद्यार्थ्यांसाठी रविवारचा दिवस हा काळच बनून आला होता. पण केवळ त्यांचं नशीब बलवत्तर आणि त्यांच्या नशिबाला तत्पर रायगड पोलिसांची लाभलेली साथ. यामुळेच बाका प्रसंग टळला.

 

मुंबईच्या पोद्दार, केळकर आणि एचआर कॉलेजचे 55 विद्यार्थी पावसाळी सहल म्हणून कुंडलिका नदीचं उगमस्थान असलेल्या देवकुंड धबधब्यावर पोहोचले होते.

धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत असतानाच, पावसाचा जोर वाढल्याने अचानक नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली.

 

काही कळायच्या आतच सर्व 55 विद्यार्थी पाण्याच्या गराड्यात अडकले आणि भीतीने त्यांची गाळण उडाली. दरम्यान हा प्रकार कळताच माणगाव पोलीस स्टेशने

सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विद्यार्थी अडकलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि राफ्टर टीमच्या मदतीने, विद्यार्थ्यांची सुटका

केली.

तब्बल दोन ते अडीच तास विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी थरारक रेस्क्यु ऑपरेशन राबवण्यात आलं… अखेरीस सुखरुप सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी देवदूत

बनून आलेल्या माणगाव पोलिसांचे आभार मानले.

Exit mobile version