Wed. Jun 16th, 2021

रायगडावर गर्दी टाळण्यासाठी प्रशासन सक्रीय

रायगड: यंदाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्यावरही कोरानाचं सावट आहे. रायगडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त लावत वाहनांची तपासणी सुरु केली आहे.

शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ‘शिवराज्याभिषेकासाठी शिवभक्तांनी किल्ले रायगडावर या’, असे अवाहन केले होते.  त्यांनी फेसबुक वर पोस्ट करुन शिवभक्तांती रायगडला येऊ नये असेही आवाहन केले होते.

मात्र शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडला येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रायगड पोलिसांनी किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त लावत वाहनांची तपासणी सुरु केली आहे.

दरम्यान, शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गर्दी करू नका, असे आवाहन संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *