Mon. Dec 6th, 2021

रायगडच्या साळाव पुलावर भगदाड, पुलावर दुर्घटना झाल्यावरच डोळे उघडणार का?

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

रायगडच्या सावित्री नदीवरच्या पुलाची दुर्घटना अजूनही काळजात धस्स करुन जाते. पण पुन्हा एकदा तशीच दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहतंय का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी अजूनही या दुर्घटनांमधून काहीच शिकत नाहीत का हेच दिसून येत. कारण रायगडमध्ये अजूनही धोकादायक पूल वापरात आहेत.

 

साळाव पुलावर भगदाड पडलं. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. नदीचं पात्र या खड्ड्यातून आरपार दिसतं. कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथेच खाडीवर हा साळाव पूल उभा आहे. मुरूड, रोहा आणि अलिबाग अशा तीन तालुक्यांना जोडणारा हा पूल तस वर्षांपूर्वी उभारण्यात आला.

 

बाहेरुन उत्तम पण आतून पोकळ अशी या पुलाची अवस्था आहे. अवजड वाहनांची वर्दळ, पुलाखालून जाणारी बेकायदेशीर बार्ज यामुळे पूलाला भगदाड पडलं. आता या पुलावरही दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल रायगडकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *