रेल्वे प्रवाशाने रेल्वेत मागवलेल्या व्हेज बिर्याणीत सापडली पाल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रेल्वे प्रवाशाने रेल्वेत मागवलेल्या व्हेज बिर्याणीत पाल सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उत्तर प्रदेशातील पूर्वा एक्सप्रेस पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या एका प्रवासाला जेवणात ही पाल सापडली आहे.
प्रवाशाने याचा फोटो ट्वीटर टाकून रेल्वे मंत्र्यांना टॅग करत या प्रकाराची तक्रार केली आहे.
रेल्वे प्रवाशांना मिळणारे जेवण खाण्यालायक नसल्याचे ताशेरे कॅगने आपल्या अहवालातून ओढल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता.
हा गदारोळ कमी होतो न होतो तोच आता पुन्हा एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशानं मागवलेल्या व्हेज बिर्याणीमध्ये पाल सापडल्याची घटना समोर आली आहे.
प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे अधिकारी खडबडून जागे झाले असून, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.