Fri. Apr 16th, 2021

सर्व रेल्वे सुविधांसाठी आता ‘रेल मदत’ app

नववर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असणारे अनेक हेल्पलाइन क्रमांक (Helpline Numbers) बंद करण्यात येणार आहेत. आता 139 क्रमांक आणि ‘रेल मदत’ (Rail Madad App) या अ‍ॅपच्या माध्यमातूनच प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान तक्रारींसंदर्भात किंवा इतर गोष्टींसाठी मदत मागता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळच्या रेल्वे वाणिज्य विभागाने निवेदनाद्वारे दिली आहे.

काय आहे नेमकं हे App?

प्रवाशांना कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी ‘रेल मदत’ या नावाने अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

या अ‍ॅपवर प्रवासी आपली कोणतीही तक्रार नोंदवू शकणार आहेत.

या अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार त्वरित संबंधित विभागाकडे पोहचवण्यात येणार आहे.

या अ‍ॅपमुळे प्रवाशांना सुविधा मिळेलच, तसंच त्यांच्या तक्रारीचं लवकरात लवकर निवारण होऊ शकेल.

याव्यतिरिक्त प्रवासी सुरक्षा सुविधेसह असलेला सहायता क्रमांक 182 सुरू राहणार आहे.

रेल्वे प्रवासी आणि ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

का बदलण्यात येतेय system?

रेल्वेतर्फे प्रवाशांची सोय आणि तक्रारींसाठी 30 पेक्षा जास्त helpline numbers सहायता क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक) उपलब्ध करुन देण्यात आले होते.

मात्र बहुतांश प्रवाशांना याबाबत योग्य माहितीच नव्हती.

त्यामुळे प्रवासी तक्रार करण्यापासून किंवा सुविधांपासून वंचित राहत होते.

हे लक्षात घेऊन रेल्वेने टप्प्याटप्प्याने सर्व क्रमांक बंद करून केवळ 139 हा क्रमांक आणि एक पोर्टल प्रवाशांच्या सेवेत आणण्याची तयारी केली आहे.

139 नंबरसोबत ‘रेल मदत’ या सहायता पोर्टलचाही प्रवासी आपल्या सोयी सुविधांसाठी वापर करू शकतील.

खरंतर या दोन्ही सुविधांचा उपयोग प्रवाशांच्या सेवेमध्ये रेल्वेने 15 जुलै 2019 पासून सुरू केला.

‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’च्या माध्यमातून हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

आधीचं ‘कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम सहायता पोर्टल’ ही एक जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *