Thu. Apr 22nd, 2021

चक्क ‘यामुळे’ रेल्वे दोन किमी धावली उलटी

रेल्वे उलटी चालल्याचे आपण कधी ऐकलं आहे का ? मात्र जळगावमध्ये असं खरंच घडलं आहे.

नक्की प्रकरण काय ?

देवळाली ते भुसावळ शटलमधून प्रवास करताना एक तरूण रेल्वे रूळावर पडला. तो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असून परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान पोल नंबर ३८३ च्या जवळ जखमी अवस्थेत पडला होता.

त्यानंतर रेल्वे त्या रुळावरून जात असताना रेल्वेच्या मोटरमन आणि गार्डला हा तरूण दिसला. त्यांनी तरूणाला तसंच सोडून पुढे न जाता. त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला.

यामुळे तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी गार्ड व रेल्वे चालकांने चर्चा करून पुढे गेलेली रेल्वे तब्बल दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मागे घेत जखमी तरुणाला जळगाव येथे आणले.

त्यानंतर जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

या सर्व प्रकारामुळे गार्ड आणि मोटरमनचे कौतुक होत आहे. रेल्वे पुन्हा उलटी धावू लागल्याने प्रवासी मात्र चांगलेच गोंधळले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *