Tue. Sep 27th, 2022

प्लॅटफॉर्म तिकिटचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का ?

रेल्वेनं दररोज देशातील लाखो प्रवाशी आंतरराज्यीय प्रवास करतात. आपल्यापैकी आतापर्यंत अनेक जणांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढली असेलच. प्लॅटफॉर्म तिकिटामुळे प्रवाशाला २ तासांपर्यंत स्थानकावर अधिकृतरित्या थांबता येते.

नातेवाईकांना गावी सोडायला जाताना अनेकांनी प्लॅटफॉर्म तिकिट काढली असेलच. परंतु या प्लॅटफॉर्म तिकिटाचे तुम्हाला अन्य फायदे माहिती आहेत का ?

या बातमीच्या माध्यमातून आपण प्लॅटफॉर्म तिकिटाचे फायदे जाणून घेणार आहोत.

हे आहेत प्लॅटफॉर्म तिकिटाचे फायदे

प्लॅटफॉर्म तिकिट आप्तकालीन परिस्थितीत फायदेशीर ठरतं. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीटाच्या आधारावर प्रवास देखील करता येतो.

अनेकदा आपल्याला रेल्वे पकडण्यासाठी घाई असते. अशाचवेळी तिकीट खिडकीवर लांबलचक रांग असते.

Image result for railway ticket window

अशावेळी आपल्याला नाईलाज म्हणून विनातिकीट प्रवास करावा लागतो. अशावेळी टीसीने पकडल्यास दंडदेखील भरावा लागतो.

परंतु अशावेळी प्लॅटफॉर्म तिकीट काढून प्रवास करता येतो.

‘यूटीएस’ या ऑनलाईन एपच्या माध्यमाने देखील तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढू शकता. प्लॅटफॉर्म तिकfटावर प्रवास करण्यासाठी रेल्वे गार्डचं सर्टिफिकेट आवश्यक असतं. हे सर्टिफिकेट रेल्वे गार्डकडून दिले जाते.

एका स्थानकापासून ते अपेक्षित स्थानकापर्यंतचा प्रवास यासाठी निश्चित भाडं घेतलं जातं. प्लॅटफॉर्म तिकिट याचंच प्रमाण आहे.

विनातिकिट प्रवास न करण्याचा संदेश

प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास म्हणजे विनातिकीट प्रवास न करण्याची मानसिकता. प्रवाशाला तिकिट काढायची होती, परंतु रेल्वे सुटू नये यासाठी तिकीट काढली नाही, असा संदेश या प्लॅटफॉर्म तिकिटच्या माध्यमातून मिळतो.   

You Can Travel in Train With A Platform Ticket Indian Railway Rule

प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन रेल्वे प्रवास करताय. तर याबाबतची माहिती सर्वात आधी टीसीला द्यावी लागते. यानंतर तुम्हाला टीसीद्वारे सुरुवातीच्या स्थानकापासून ते अपेक्षित स्थानकापर्यंतचं तिकीट देण्यात येतं.

म्हणून २५० रुपये दंड

टीसीला तुम्हाला तिकिटाच्या रक्कमेसह २५० रुपये दंड द्यावा लागतो. परंतु प्रवाशाकडे केवळ प्लॅटफॉर्म तिकीट असल्याने संबंधित प्रवाशावर विनातिकीट प्रवास केल्याचा ठपका लावता येत नाही. विनातिकीट प्रवास केल्यास १ हजार २६० रुपये इतका दंड भरावा लागतो. तसेच सहा महिन्यासाठी कारावासही होऊ शकतो.

एकूणच काय तर आपात्कालीन परिस्थितीत विनातिकिट प्रवास करण्याऐवजी प्लॅटफॉर्म तिकिट काढून प्रवास करण्याचा पर्याय आपल्याला रेल्वेकडून देण्यात आला आहे.त्यामुळे विनातिकीट प्रवास करुन १ हजार २६० रुपयांचा दंड भरण्यापेक्षा प्लॅटफॉर्म तिकीट काढून २५० दंड भरणं केव्हाही योग्यच ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.