Tue. Dec 7th, 2021

कोल्हापूरात पूरस्थिती अधिकच गंभीर, चहूबाजूंनी संपर्क तुटला

कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होत चालली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाऊसाची संततधार अजूनही सुरूच आहे. आर्मी दाखल,नेव्हीची पथके हेलिकॅप्टरसह आज दाखल होणार आहेत. कोल्हापूरचा चहूबाजूंनी संपर्क तुटला आहे.

कोल्हापूरात पूरस्थिती अधिकच गंभीर

कोल्हापूरात पूरस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. सध्या युध्दपातळीवर बचावकार्य सुरू असून पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळावर हलवण्याचं काम सुरु आहे.पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थीतीवर नियंत्रणात आणण्यात अडथळा निर्माण होत आहे. सुमारे 45.000 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

नेव्हीच्या दोन विमानातून २२ जणांचे पथक एक बोट दाखल कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे. आर्मी दाखल,नेव्हीची पथके हेलिकॅप्टरसह आज दाखल होणार असल्याची माहीती मिळाली आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ सुरूच असल्याने परिस्थीती गंभीर होत चालली आहे.

कोल्हापूरातील पंचगंगा नदीचे पाणी सुमारे 55 फुटांवर आलं आहे. यामुळे 18 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे. या पुराचा फटका 49 हजार नागरिकांना बसला आहे. तर कोल्हापूरचा चहूबाजुंनी संपर्क तुटला आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद आहेत.

शाळा महाविद्यालयांना सुट्टी तर गोकुळचे संकलन बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पेट्रोल,डिझेल संपण्याच्या मार्गावर आहे. गोवा कोस्ट गार्डचे एक हेलिकाँप्टर दाखल चारजणांचे पथक बोटीसह दाखल झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *