Wed. Oct 27th, 2021

कोल्हापूर आणि उस्मानाबाद मध्ये मतदानावर पावसाचे सावट

सकाळपासून पाऊसाचा वेग वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मतदानाचा वेग मंदावला आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या समोर पाणी साचले आहे. काही मतदान केंद्रावर गळतीमुळे पाणी साचले होते त्यामुळे दरवेळेस मतदान केंद्राच्या बाहेर दिसणाऱ्या रांगा यावेळी मात्र दिसल्या नाहीत.

उस्मानाबाद जिल्हात उस्मानाबाद कळंब, तुळजापूर उमरगा लोहार,व परंडा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत यासाठी 1991मतदान केंद्र आहेत. 13 लाख मतदार 50 उमेदवारासाठी मतदान करणार आहेत. जवळपास सर्वच मतदान केंद्रावर पाऊसाचा परिणाम जाणवत आहे.

आज महाराष्ट्रात सर्वत्र निवडणूक प्रक्रीया पार पडत आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूर मध्ये आज दहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर दुसर्‍या बाजूला पावसाचे सावट या प्रक्रियेवर दिसून येत आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

राधानगरी, काळम्मावाडी तुळशी,कुंभी, कासारी सर्व धरणे भरली आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्रीत 5 फुटांनी वाढली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात राजाराम बंधारा पाच वेळा पाण्याखाली गेला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात मतदान करण्याचे  जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *