Mon. Jul 22nd, 2019

यंदा मान्सून 4 दिवस उशिरा; स्कायमेटचा अंदाज

0Shares

सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र देशात मान्सून 4 दिवस उशिराने धडकणार असल्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा सामना करावा लागणार आहे. यंदा केरळ किनारपट्टीवर 4 जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे खाजगी हवामान अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. तसेच यंदा पाऊस कमी पडणार असल्याचेही अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.

काय आहे स्कायमेटचा अंदाज ?

दरवर्षीप्रमाणे केरळ किनारपट्टीवर येणारा पाऊस यंदा चार दिवसांनी धडकणार आहे.

तसेच अंदमान निकोबारला 22 मे रोजी मान्सून धडकणार आहे.

दरवर्षी 1 जूनला केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होते.

यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

यावेळी ९३ टक्के पाउस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पूर्व, उत्तर पूर्व, मध्य भारतात पाऊस कमी पडणार आहे.

तसेच उत्तर-पश्चिम, दक्षिण भारतात सामन्य पडणार आहे.

या दरम्यान मध्यप्रदेश, विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

मात्र स्कायमेटने वर्तवलेला अंदाज आतापर्यंत एकदाच खरा ठरला आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: