Tue. Aug 9th, 2022

बुलडाण्यात पावसाचा हाहाकार

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरासह परिसरात जोरदार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस धोधो बरसला आहे. अचानक आलेल्या या पावासमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता की अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सुमारे दोन तास सलग पाऊस सुरू राहिला.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्यानं शहरात काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या पावसाने शेगाव शहराचा वीज पुरवठा दोन तास खंडीत झाला होता. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांना आपली रात्र जागून काढावी लागली.जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे.

बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर असंख्य गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून काल रात्रीपासून गावे अंधारात आहेत व आजही अंधारातच राहणार चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील पैनगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, धामना, पेन, कोराडी, यासह छोट्या मोठ्या नद्या व नाल्यांना पूर आले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती टीम सर्व बाबीवर लक्ष ठेवून सतर्क आहे.तर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.