राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शिल्पा शेट्टी यांचे पती आणि प्रख्यात उद्योगपती राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या पथकानं मढ इथल्या ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी अश्लील चित्रपटांचं चित्रीकरण होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाईल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक केली आहे. राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कसा चालायचा हा काळा धंदा?
- राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी ग्रेट ब्रिटनमध्ये राहतात.
- प्रकाश बक्षीची केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी आहे.
- ही कंपनी अश्लील चित्रपटांना आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.
- या कंपनीमध्ये राज कुंद्रा यांनी गुंतवणूक केली आहे
कसे करायचे काम ?
- फेब्रुवारीमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटां मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
- त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती.
- गहना वशिष्ठ आणि उमेश कामत केनरिन कंपनीसाठी अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत असे.
- अश्लील फिल्म केनरिन प्रॉडक्शन हाऊसला पाठवल्या जात.
- अश्लील चित्रपट निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे थेट यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले जायचे.
- सोशल मीडिया अॅप हॉटस्पॉटवर हे अश्लील चित्रपट अपलोड केले जात होते.