Thu. Sep 29th, 2022

शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने जाहिरपणे शिल्पाची मागितली होती माफी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शिल्पा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. शिल्पा अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. त्यामुळे चाहत्ये हे शिल्पाच्या संपर्कात राहतात. मात्र, एकवेळ असा होता की जेव्हा राज आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी वेगळे झाल्याचं कारण हे शिल्पा शेट्टी आहे अशा चर्चा होत्या. राज कुंद्राची पूर्वाश्रमीची पत्नी कविताने २००७ मध्ये शिल्पावर लग्न मोडण्याचा आरोप केले होता. त्यानंतर राजने सगळ्यांसमोर येऊन शिल्पाची जाहिरपणे माफी मागितली. शिवाय त्यावेळी राजने हे स्पष्ट केलं होते की ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचं सांगितले होते. त्यावेळी राजने सांगितलं होतं की, “माझी पत्नी व मी नऊ महिन्यांपूर्वी विभक्त झालो आणि चार महिन्यांपूर्वी आम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेण्याची कारणे चर्चा करण्यासारखी नाही ती वैयक्तिक आहेत आणि त्या कारणांवर चर्चा केली तर माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव खराब होईल आणि मला हे मान्य नाही. सध्या माझ्यात आणि शिल्पामध्ये व्यावसायिक सोडून कोणतेही संबंध नाही.” शिल्पाची माफी मागतं राज म्हणाला, “मला वाईट वाटते की काही वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने एका लोकप्रिय सेलिब्रिटीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने केलेल्या धक्कादायक आरोपासाठी मी शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटूंबाची माफी मागतो.” असं त्यावेळी राजने म्हटलं होतं मात्र राज आणि कविता विभक्त झाल्यानंतर शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केलं. यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात मात्र खरेच शिल्पामुळेच राज आणि कविताच लग्न मोडलं असणार का? आता वेळेबरोबर या गोष्टी मागे गेल्या आहे. मात्र सध्याला शिल्पा आणि राजला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचे नाव विवान तर मुलाचे नाव समीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.