Thu. May 13th, 2021

माझ्या प्रत्येक भाषणात PMC बँक घोटाळ्याप्रकरणी बोलणार – राज ठाकरे

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लादल्यानंतर खातेदार चांगलेच अडचणीत आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यापुढे समस्या मांडल्या आहेत.

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लादल्यानंतर खातेदार चांगलेच अडचणीत आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यापुढे समस्या मांडल्या आहेत. आमच्या समस्यांबाबत तुमच्या भाषणात बोला अशी विनंती त्यांनी राज ठाकरेंना केली आहे.

राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. ऐन सणासुदीच्या वेळी खातेदारांची तारांबळ उडाली आहे. राज ठाकरे यांनी हा मुद्दा आपल्या भाषणात लावून धरला आहे. पीएमसीच्या संचालक मंडळावर भाजपचे असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यामुळेच राज ठाकरेंची भेट खातेदारांनी घेतली आहे.

पीएमसीच्या खातेदारांच्या समस्यांकडं सरकार का लक्ष देत नाही? असा सवाल राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. ‘पीएमसी घोटाळा प्रकरणी मी प्रत्येक भाषणात बोलणार आहे. यापुढंही बोलत राहीन आणि निवडणुकीनंतर या प्रश्नी पाठपुरावा करेन,’ असा शब्द राज यांनी खातेदारांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *