Fri. Jun 21st, 2019

सभांचा खर्च मोजण्यापेक्षा 5 वर्षात किती थापा मारल्या हे मोजा – राज ठाकरे

910Shares

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते प्रचार सभा घेत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात जाहीर सभा घेतली.सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली. सभांचा खर्च मोजण्यापेक्षा 5 वर्षात किती थापा मारल्या हे मोजा असे राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच गेल्या पाच वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

पाच वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

यापूर्वीचे लोक वाईट होती म्हणून हे सत्तेत आली. मात्र हे त्याहून वाईट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जी स्वप्न दाखवली त्याबद्दल मोदी काही बोलत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

पुलावामातील जवानांच्या नावावर मोदी मत मागतात असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जातीपातीवरून एकमेकांना भडकवण्याचं काम सरकारने केले .

दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या दिल्या असत्या तर 5 वर्षात 10 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या.

तसेच  40 कोटी लोकांना फायदा झाला असता.

मात्र पंतप्रधान यांना झटका आला आणि नोटबंदी जाहीर केली.

यामुळे 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या अशी अधिकृत माहिती समोर आली. मात्र अनाधिकृत माहिती नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

बाबासाहेबाचे स्मारकाबद्दल पाच वर्षापासून बोलत आहेत, त्या स्मारकाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला.

आरक्षण देण्याच्या नावावर लोकांना फसवलं असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असं मुख्यमंत्री सांगतात, पण कोणत्या विहिरीवर पाणी भरायला मुख्यमंत्री गेले होते? असा टोला लगावला.

नोटाबंदीमुळे सोलापूर परिसरात काम करणारे कामगार 84000 वरून 44000 वर पोहोचले आहेत.

हिटलरने जर्मनीमध्ये जे केलं तेच भाजपाला या देशात करतं आहे.

पाकिस्तानात जाऊन मोदींनी बिर्याणी खाल्ली, शरिफांना केक भरवला त्यावेळी शहिदांना किती दुःख झालं असेल? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

910Shares

Leave a Reply

%d bloggers like this: