Mon. May 27th, 2019

लाव रे तो व्हिडीओ; पुण्यात राज ठाकरे यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात सभा घेत आहे. आज पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. मोदींनी जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांवर बोलायला तयार नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच शहीद जवानांच्या जीवावर मत मागत असल्याचा आरोप लावला.

काय म्हणाले राज ठाकरे ?

पुणे, मुंबई ही शहरं पूर्वी खूपच सुंदर होती. पण प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत गेली.

आपली शहरं नुसती वाढत जात आहेत. या शहरांमध्ये पुरेसं पार्किंग नाही, कॉलेजेस नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत.

पाच वर्षांपूर्वी मोदींनी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांवर बोलण्यास तयार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शहीद जवानांच्या जीवावर मत मागत असल्याचा आरोप लावला भाजपा सरकारवर लावला.

माढ्यात मोदींनी ‘मी खालच्या जातीचा असल्यामुळे माझ्यावर आरोप होत’ असल्याचे म्हटलं आहे.

गेल्या 5 वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता?

गुजरात, उना मध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा गप्प का होते? असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

2012 साली बलात्काराच्या घटना 24922 होत्या तर 2016 ला हा आकडा 38811 आहे.

तुम्ही काहीतरी वेगळं करणार म्हणून तुम्हाला सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेत आल्यावर आधी पेक्षा देश रसातळाला गेला.

या देशाला खरंच पुतळ्यांची गरज आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

डोकलामच्या वेळेला असं वातावरण निर्माण केलं की कधीही युद्ध होईल.

चीनवर,चीनच्या वस्तूंवर बंदी आणा, मग एवढं होतं तर मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनवून आणला?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का?

स्वतः मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? असेही त्यांनी विचारले.

सत्तेत आल्यावर राजकीय पक्षाचं जगातलं सगळ्यात आलिशान कार्यालय भाजपाने दिल्लीत उभारलं, त्यासाठी पैसे कुठून आणले?

रामदेवबाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला. त्यांचा व्यवसाय 5 वर्षात इतका कसा फोफावला?

स्वच्छ भारतच्या नावाखाली इतका कर गोळा केलात, कुठे आहे तो पैसा? खरंच भारत स्वच्छ झाला का ?

मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केलं तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळालं देशाला?

तुमचा आमचा पैसा घेऊन विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी, निलेश पारेख, नितीन संदेरसा, चेतन संदेरसा, रितेश जैन, सभ्या सेठ विक्रम कोठारी हे देशाबाहेर पळून गेले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *