Wed. Dec 1st, 2021

एवढं खोटं बोलणारा पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही – राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सभा घेतली. राज ठाकरेंच्या सभेदरम्यान ‘दाखवून’ देण्याच्या नव्या खुमासदार शैलीमुळे ते सध्या फॉर्म मध्ये आहेत. या सभेमध्ये त्यांच्या या अनोख्या शैलीमुळे ते जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनतो आहे. या सभेमध्ये भाजपावर डागलेल्या तोफेचा नेहमीसारखाच स्फोट पाहायला मिळाला. या सभेमध्ये देशावरच्या शाह-मोदी यांच्या सत्तेला त्यांनी ‘संकट’ म्हणून संबोधले आहे, त्यासाठीच ही प्रचारसभे मागचे प्रयोजन असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेक इन महाराष्ट्राला शिकवू नये. असे राज ठाकरे म्हणाले.

मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो त्यामुळे कुठलाही राजकारणी खोटं बोलत नाही.

सभांचा खर्च आम्ही करतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहे का ? असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात असल्याचं वक्तव्य केलं आहे.

नोटाबंदीच्या विरोधात राज ठाकरेंनी मोदींचा समाचार घेतला

नोटबंदी करताना रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरना, अर्थमंत्र्याला, मंत्रिमंडळाला विश्वासात घेतलं नाही.

काही शे-कोटी खोट्या नोटांसाठी तुम्ही अर्थव्यवस्थेतल्या 16 लाख कोटी नोटा काढून घेतल्या असे राज ठाकरे म्हणाले.

नोटबंदीचा हेतू स्वच्छ नव्हता – नोटबंदीच्या निर्णयामुळे साडेचार ते पाच कोटी लोकं बेरोजगार झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण देश तुमच्या हातात, मग काळा पैसा का आला नाही ? असाही सवाल त्यांनी केला.

पंतप्रधान नोटबंदीबद्दल का बोलत नाही? जवानांच्या नावावर मतं का मागताय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बिहार मध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले 1 आठवड्यात 50 लाख शौचालय बांधली, काय बोलत आहेत पंतप्रधान? असा प्रश्न यावेळेस निर्माण केला.

बेरोजगार तरुण नोकरीचं शोधात फिरतोय. हे तुम्हाला स्वप्न दाखवणार आणि पुन्हा तुमच्या पदरी पुन्हा निराशा

अमित शाहांना राज ठाकरेंनी ‘मोदींचे पिट्टू’ म्हणून संबोधले.

गंगेच्या स्वच्छतेसाठी 20 हजार कोटी खर्च केले. मग कुठे झाली स्वच्छ गंगा? कुठे गेले 20 हजार कोटी रुपये?

देशाच्या सैन्याचा आम्हाला अभिमान आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी हे ह्या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत जे माध्यमांना एकदाही सामोरे गेले नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत.

एअर स्ट्राईकमध्ये आम्ही 250 माणसं मारली, असं अमित शाह म्हणाले. ते गेले होते का को-पायलट म्हणून?

पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *