राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिपबोनवर शस्त्रक्रिया करण्यासाठी राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आला आहे. राज ठाकरे सध्या लिलावती रुग्णालयातून घरी परतले आहेत. १ जून रोजी राज ठाकरेंच्या हिपबोनवरील शस्त्रक्रिया होणार होती पण त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे मागील काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी सभासुद्धा घेतल्या होत्या. त्यानंतर ते शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात दाखल झाले होते पण घेतलेल्या बैठकांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंच्या हिपबोनवरील शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचणी अहवाल काढण्यात आले. यावेळी कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे त्यांना घरी राहून कोरोनावर उपचार घेता येईल. परंतु शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली असून कोरोनातून बरे झाल्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल.