Wed. Jun 26th, 2019

धनत्रयोदशीनिमित्त राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

0Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून भाजप सरकारला चांगलेच फटकारले आहे.  धनत्रयोदशीनिमित्त देशातील परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले आहे. हे व्यंगचित्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी ‘भारत’ देशाला आयसीयूमध्ये दाखवले असून धनत्रयोदशी या दिवसाचे महत्व सांगितले आहे. त्यात ‘हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे नमूद केले आहे.

यावर आयसीयूबाहेर काळजीत उभे असणाऱ्या जनतेला धन्वंतरी सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर टीका केली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: