Thu. Mar 21st, 2019

नरक चतुर्दशीनिमित्त राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारे

0Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीचं निमित्त साधत व्यंगचित्रातून भाजप सरकारला फटकारायला सुरवात केली आहे.

धनत्रयोदशीनिमित्त देशातील परिस्थितीवर व्यंगचित्र रेखाटत त्यांनी भाष्य केले. तर आज नरक चतुर्दशी पुन्हा एकदा भाजपाला व्यंगचित्रातून लक्ष्य करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न रेखाटलं आहे.

या व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं आहे. नरक चतुर्दशी या दिवशी कारेटं पायाखाली फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले असून झोपलेली भाजपा पार्टी झोपलेली स्वप्नात अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्यात असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याचीही परंपरा आहे.  याचाच संदर्भ घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलताना दिसत आहे की, साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ‘धुवायला’ आलाय, पाठवू का? तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *