Fri. Dec 3rd, 2021

“पुलवामातील शहीद हे राजकीय बळी” – राज ठाकरे

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील  यांची भेटही घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र सतेज पाटील यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आज एका खासगी वाहिनीचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी कोल्हापूरात सभा घेतली.

काय म्हणाले राज ठाकरे  ?

मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी कोल्हापुरातील सभेत सरकारवर जोरदार टिका केली.

राज ठाकरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोदींवर सरकारवर गंभीर आरोपही केले.

नोटबंदी, भ्रष्टाचारासह इतर मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने 40 जवानांचे राजकीय बळी घेतले असल्याचा घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली

पुलवामातील शहीद हे राजकीय बळी ठरले आहेत.

तसेच राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, असा दावा राज ठाकरे यांनी सभेत केला

पाकिस्तानचं पाणी सरकार बंद करणार आहे.

पाकिस्तानचे पाणी अडवण्यासाठी आडवा बंधारा म्हणून अमित शहा झोपणार का? आशी खिल्ली  राज यांनी उडवली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *