Wed. Oct 27th, 2021

पुण्यातील सभेत राज ठाकरे यांची सरकारवर कडाडून टीका

पुण्यामध्ये कसबा येथे मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज जाहीर सभा झाली. या सभेतही त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

पुरामुळे लोकांची घरं वाहून गेली, आणि सरकार प्रचारामध्ये मग्न होतं.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचा एक मंत्रीच कोथरुडपर्यंत वाहत आला.

सव्वाशे वर्ष मराठेशाहीने संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही.

त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो.

पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल आहेत.

गुजरातमध्ये 3000 कोटी रुपये खर्चून सरदार पटेल यांचा पुतळाही उभा राहिला.

अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं की ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’?

ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी.

बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो.

सरकारने घोषणा केली होती कि ‘100 स्मार्टसिटी घडवणार’. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी?

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?

पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता?

ऑटोमोबाईल क्षेत्रातून आगामी काळात 10 लाख रोजगार कमी होतील…
नोटबंदी आणि जीएसटीनंतर देशात भीषण परिस्थिती आहे..नोटबंदीनंतर मी सांगितलं होतं की हा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल..आणि आता काय होतंय ते तुमच्यासमोर आहेच….
मुंबईतून अहमदाबादला जाणाऱ्या 40 टक्के गाड्या रिकाम्या जातात..तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेट ट्रेनचा हट्ट धरला..त्यासाठी एक लाख कोटींच कर्ज काढलं…हा हट्ट कशासाठी…
आपली भाषा टिकावी यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाही, छत्रपतींच्या स्मारकासाठी काही होताना दिसत नाही.. सरकार येतात सरकार जातात काहीच होत नाही..महाराष्ट्रत 10 स्मार्ट सिटी आणणार होतात त्याच काय झालं? पावसामुळे घराघरात पाणी शिरलं? हीच का स्मार्ट सिटी…नाशिकमध्ये आम्ही सत्तेत असताना केलेली कामं स्मार्ट सिटीत दाखवली गेली…
इथली माणसं थंड पडली हे राज्यकर्त्यांनी ओळखलं..त्यामुळे ते कुणाला जुमानत नाहीत..नाशिक मध्ये सत्तेत असताना मी इतकी काम केली..जर महाराष्ट्रत सत्ता आली तर महाराष्ट्रत काय काय करेन याचा विचार करा..त्याच त्याच लोकांना जनता निवडून काशी देते समजत नाही..
ईव्हीमसाठी मी भांड भांड भांडलो..सगळ्या राजकीय पक्षांना मी बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं..पण कुणी ऐकलं नाही..
पुण्यात शिवसेना कुठं दिसतच नाही..त्यांना हे ही कळत नाही की, भाजपवाले त्यांची इज्जत काढत आहेत…(उद्धव ठाकरेंनी नकल) इतक्या मोठ्या शहरात त्यांना एक जागा देत नाहीत..(प्रेक्षकांतुन लाचार लाचार च्या घोषणा) बाळासाहेब असते तर भाजपवाल्यांची अशी वागण्याची हिम्मत नसती झाली…
उद्या सरकारने चांगलं काम केलं तर मी कौतुक केलं.कलम 370 रद्द केलं.. तुमचं अभिनंदन.. मी इटक्याही कोत्या मनाचा नाही..पण महाराष्ट्र आहात तर महाराष्ट्रच्या प्रश्नावर बोला..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *