Mumbai

राज ठाकरे भोंग्याच्या भूमिकेवर ठाम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत भोंगे उतरवण्याबाबत ४ मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार आज राज्यात अनेक पडसाद उमटले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. भोंग्याच्या विषय निकाली लागेपर्यंत आंदोलन कायम असून भोंग्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच नोटीस फक्त आम्हालाच का दिल्या जातात? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात आज अनेक मशिदींमध्ये अजान झाली नाही, त्यामुळे भोंगे न लावणाऱ्या मौलवींचे राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. तसेच मुंबईतील बहुतांश मशिदी अनधिकृत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. भोंगा हा सामाजिक विषय असून या विषयाला धार्मिक वळण देऊ नये, असे आवाहनही राज ठाकरेंनी दिले आहे. तर पोलिसांकडून मशिदींवर कारवाईची अपेक्षा असल्याची प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, अजानसाठी माईक, स्पीकर का हवेत? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, न्यायालयाच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. तसेच मशिदींवर अजान दिली तर हनुमान चालिसा लावणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंबईतील बहुतांश मशिदी अनधिकृत असून अनधिकृत मशिदींवर कारवाई हाणार का? असा सवालही राज ठाकरे यांनी गृहखात्याला विचारला आहे. तसेच हा विषय मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा नाही तर मंदिरांवरील भोंगेही खाली आली पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता नवा वाद उफळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

6 days ago