Sun. Jun 16th, 2019

राज ठाकरेंचा स्टँडअप कॉमेडी शो सुरू आहे – विनोद तावडे

279Shares

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा प्रचार करण्यासाठी सभा घेत आहेत. यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार उभा केलेला नसून ते कोणासाठी सभा घेत आहेत ? असा प्रश्न विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले विनोद तावडे ?

सध्या राज ठाकरे लोकसभा निवडणुकींसाठी प्रचारसभा घेत आहेत.

त्यामुळे मनसे पक्ष निवडणुका लढत नसून राज ठाकरे कोणासाठी प्रचार करत असल्याचा सवाल विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच राज ठाकरे यांची स्टँडअप कॉमेडीचा शो मुंबई बाहेरही सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी विनोद तावडे यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले.

त्याचबरोबर सिंचन घोटाळ्याच्या चौकशीनंतर कळेल की कोण कुठे जाईल ? असा इशारा विनोद तावडे यांनी विरोधकांना दिला आहे.

तसेच राज ठाकरे यांचा एक आमदार किंवा खासदार नाही आणि ते मोदी आणि शाह यांना संपवण्याची बाता करत असल्याचे त्यांनी म्हटलं.

 

279Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *