Mon. Dec 6th, 2021

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 15 मिनिटे चर्चा झाली

शरद पवारांची वारंवार योगायोगाने भेट झाली असं म्हणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे समजते आहे. शरद पवार यांच्या निवास्थानी 15 मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे अजून रहस्यच आहे.

मोदी-शहाविरोधात सभा घेणार –

राज ठाकरे यांनी बुधवारी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजप सरकारवर टीका केली.

तसेच चौकीदार हे फास, नाटक आहे. त्याच्या भानगडीत पडू नका असेही म्हणाले.

आतापासून मोदी-शहाविरोधातच सभा घेणार अशी घोषणाही केली.

तसेच भाजपाला मतदान करु नका, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असंही त्यांनी म्हटलं.

मात्र बुधवारी सकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांनी भेट घेतली.

या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती मिळाली नाही.

सध्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि मनसेची जवळीक वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *