Sat. Jun 6th, 2020

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट

EVM मशीनच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असल्यामुळे त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र नक्की काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळालेली नाही.

नेमकं काय घडलं ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे EVM मशीनच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते.

यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.

EVMमध्ये घोळ असल्याचा आरोप लावत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचे म्हटलं आहे.

तसेत त्यानंतर राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अर्धातास चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *