Wed. Jun 26th, 2019

मोदींकडून प्रजासत्ताकाला फाशी; राज ठाकरेंनी साधला मोदींवर  निशाणा

0Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यामातून निशाणा साधला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी ट्विटरवरून व्यगंचित्र शेअर केले आहे.

या व्यंगचित्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर असून ते दोघे लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच या व्यंगचित्रात ‘स्वतंत्रते न बघवते’ असेही लिहले आहे.

आता राज ठाकरेंच्या या चित्राला भाजपा कोणत्या पद्धतीने उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या आठवड्यातही राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली होती. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून लगावला होता.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: