Wed. Jan 19th, 2022

मनसेचा मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नाही- राज ठाकरे

मनसेकडून ९ फेब्रुवारीला काढण्यात येणारा मोर्चा हा सीएएच्या समर्थनार्थ नसणार असल्याचा खुलासा (Raj Thackeray On CAA) राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आज बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

सोमवारी रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. परंतु राज ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे अवघ्या १० मिनीटांनंतर निघून गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये सीएएच्या मुद्द्यावरुन संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

पदाधिकाऱ्यांमध्ये सीएएबद्दलचा असलेला गोंधळ दूर करण्यासाठी आज पुन्हा कृष्णकुंजवर बैठक घेण्यात आली.

काय म्हणाले राज ठाकरे ?

मंगळवारी झालेल्या बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, मी सीएए कायद्याला समर्थन केलंल नाही. मी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला गेला, असं राज ठाकरे म्हणाले.

सीएए कायद्याला माझं समर्थन नाही. परंतु घुसखोर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना हाकला असं मी म्हंटल होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका –राज ठाकरे

त्यामुळे आता राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केला असल्याची चर्चा देखील होत आहे. दरम्यान प्रकृती स्थिर नसल्याने राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा दौरा रद्द केला असल्याचं समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *