Sun. Jun 20th, 2021

कलम 370 बद्दल अभिनंदन, 371 जागांवरील घोळाचं काय? – राज ठाकरे

रवींद्रनाट्य गृह येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मनसैनिकांना संबोधित केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष बांधणी आणी ईव्हीएमच्या विरोधात आज राज ठाकरे या मेळाव्यात बोलले. या सभेत त्यांनी गिरीष महाजनांच्या महापुर दौऱ्यावर टीका केली.

रवींद्रनाट्य गृह येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मनसैनिकांना संबोधित केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष बांधणी आणी ईव्हीएमच्या विरोधात आज राज ठाकरे या मेळाव्यात बोलले. या सभेत त्यांनी गिरीष महाजनांच्या महापुर दौऱ्यावर टीका केली. तसेच EVM आणि निवडणुकांवरून मोदी आणि BJP ला चांगलच धारेवर धरलं आहे.आम्ही मेहनत करणार प्रचार करणार पैसा खर्च करणार पण जर रिझल्ट ठरलेला असेल तर कशाला निवडणुका लढवायच्या मी यासाठीच सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जींना भेटलो. असं ही ते म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

कोल्हापूर, सांगली इतर भागात काय परिस्थिती आहे याचा आपल्याला कल्पना आहे. इतर मंत्री हेलिकॉप्टर ने फिरत आहे पण हेलिकॉटर काही खाली उतरत नाहीत तर गिरीश महाजन सेल्फी काढतात यावरून त्यांनी गिरीश महाजनांना चांगलचं धारेवर धरलं आहे. या मंत्र्यांनी काही ही केलं तरी लोक मत यानांच देणार अशी टीका ही त्यांनी केली आहे.

आर टी आय मध्ये फेरबदल झाले. माहितीचा अधिकार आता केंद्राने स्वतःकडे केलं, ही सगळी माणसं त्यांचा कार्यकाळ आणि पगार केंद्र ठरवणार म्हणजे मोदी आणि शहा ठरवणार आहेत. नरेंद्र मोदी बीए पास आहेत की नाही यावर हे सगळं सुरू झालं, एकाने याबाबत याचिका टाकली होती. आणि आर टी आय मध्ये फेरबदल झाले. याच्या पुढे तुम्हाला माहिती मिळणार नाही. याची लिस्ट मागितल्यानंतर ज्याने लिस्ट दिली याची बदली केली जर आर टी आय मधून माहिती मिळणार नसेल तर आर टी आय कशाला पाहिजे. UAPA या कायद्याची भारताला गरज नाही तरी तो लादण्यात आली.

एका माणसावर जरी संशय आला तर त्याला दहशतवादी म्हणून घोषित करणार, जर एखाद्या माणसाने आंदोलन केलं तरी त्याला दहशतवादी ठरवणार, हे ठरवणार कोण तर अमित शहा ठरवणार ही अशी हिम्मत कशामुळे आली तर बहुमतामुळे आली.

देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. जेट एअर वेज बंद पडली, सरकार ने मदत केली पाहिजे होती. एअर इंडिया तोट्यात, बी एस एन एल मधून 54 हजार कामगार बाहेर पडले.
एअर सेल कंपनी बंद झाली. ओ एन जी सी तोट्यात, स्टेट बँक तोट्यात गेली. गेल्या 45 वर्षापेक्षा मोठी अर्थीक परिस्थिती वाईट आहे. बँक डबघाईला आल्या तर पैसे कुठून देणार 6 लाख कंपन्या देशात बंद झाल्या.

एका माणसला वाटलं म्हणून नोटा बंद केल्या. लोकांना रांगा मध्ये उभं केलं अनेक माणस त्यात गेली. जीएसटी लावली यामुळे राज्यात पालिकेला पैसे येत नाही मग ही शहर कशी चालणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *