Wed. Oct 5th, 2022

गाफील राहू नका; मोदी, शहांना राजकीय पटलावरुन बाद करा – राज ठाकरे

आगामी निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार उभं न करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे सांगत यावेळी भाजपच्या प्रचारसभेवर आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा खरपुस त्यांनी  समाचार घेतला. तसेच, निवडणुकांच्या आधी मोदींच्या भाषणाचा आणि निवडणुकांमधील भाषणांमध्ये असणारा  फरक दाखवून दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

अमित शहा, मोदीच्या विरोधात प्रचार करणार हा माझा राग आहे . ज्या माणसावर विश्वास टाकला  त्याने घात केला .
गुजरातच्या दौऱ्यादरम्यान मला खोट चित्र दाखवलं गेलं. महिला, शेतकरी, कामगार, तरुणांना खोटी स्वप्न दाखवली गेली.
नरेंद्र मोदीच्या सभेत काळा शर्ट, बनीयन घातला तर त्याला बाहेर काढल.आमचा पंतप्रधान काळ्या रंगाला का घाबरतो.
आश्वासन पूर्ण करता आली नसल्याने कारण मोदी बिथरले आहेत. बोलण्यासारखं काही उरल नसल्याने ते  घाबरत आहेत.
भाजप सरकारच्या काळात १४ हजार शेतकऱ्यांनी  आत्महत्या केली आहे.
शेतकरी, महिला, कामगार, यांना फक्त खोटी स्वप्नं दाखवली. गुजरात दौर्या दरम्यान आम्हाला खोटं चित्र दाखवली.
शेतक-यांना फक्त स्वप्नं दाखवली गेली, चित्र दाखवली, ती प्रत्यक्षात उतरवता येत नाही.
मोदी मराठवाड्यात आले पण मराठवाड्यातल्या शेतकरी, तरुणांबदद्ल मोदींनी एक शब्द काढला नाही.
मराठवाड्यात अंत्यत भिषण परिस्थीती असून  हजार, बाराशे फूटावर पाणी लागत नाही. असं इस्त्रोचा हा रिपोर्ट सांगतोय.
परिस्थिती अशीच कायम राहीली तर  पुढच्या 50 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल.
शहिदांसाठी मत द्या असं  म्हणतात  यावरुन मोदीच्या मनात जवानांबद्दल काय आस्था आहे हे समजलं.
एफडीआय,आधार, जीएसटीला मोदींनी विरोध केला मात्र सत्तेवर आले तेव्हा याच योजना राबवल्या.
मोदी नेहरु, इंदिरा गांधीवर नाहक टीका करतात असले तरी कॉपी मात्र याच नेत्यांची करतात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.