Tue. Feb 25th, 2020

राज ठाकरे साडेआठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 च्या सुमारास ते शिवाजी पार्क येथील आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानावरून निघाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 च्या सुमारास ते शिवाजी पार्क येथील आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानावरून निघाले. तब्बल साडेआठ तास त्यांची चौकशी झाली. गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्यात येईल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

राज कृष्णकुंजवर परतले..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ED कार्यालयात चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 च्या सुमारास ते शिवाजी पार्क येथील आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानावरून निघाले.यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे. पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी हे सर्वजण राज यांच्या सोबत निघाले.

राज ठाकरे आपल्या लकी नंबर असलेल्या 9 नंबर च्या लँड क्रूझर गाडी ने रवाना झाले.पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे हे मागच्या गाडी ने रवाना झाले.राज ठाकरे यांच्या आई त्यांना गाडी कडे सोडण्यासाठी आल्या होत्या.

राज ठाकरे यांची कोहिनूर प्रकरणी ED कडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत होतं. आधी ED कार्यालयाच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र बंद ठेवण्याचं आवाहन मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी तसं न करण्याची सूचना दिली.

रात्री सव्वाआठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले असून 12 वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले. साडेआठ तासांच्या चौकशीत राज ठाकरे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं राज ठाकरे यांनी दिली. आता राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *