Sun. Feb 28th, 2021

राज ठाकरेंच्या ED चौकशीच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्याचं आत्मदहन!

राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. मनसे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहेत. यापूर्वी ‘बंद’ची हाक देणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. त्यानंतर शांत मोर्चा काढण्याचा निर्णय मनसे कार्यकर्त्यांनी घेतलाय. या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवीण चौगुले नावाच्या एका तरुणाने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री उशीरा ठाण्यात घडलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं सांगून प्रविणने आत्महत्या केली असल्याचं त्याच्या मित्रांचे म्हणणं आहे.

2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आलीये आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

या घटनेमुळे आपण दुखावलो असून आत्महत्या करतोय असं वारंवार प्रविण त्याच्या मित्रांना सांगायचा.

एवढंच नाही तर काल दिवसभरात प्रविणने राज ठाकरे यांच्या समर्थन करणाऱ्या आणि ED विरोधात अपशब्द वापरलेल्या शंभरपेक्षा जास्त फेसबुक पोस्ट लिहिल्या आहेत.

प्रविण ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता.

मनसेचा कोणताही कार्यक्रम असो की मोर्चा आंदोलन, प्रविण पुढे असायाचा.

प्रत्येक मोर्चात प्रविण शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून यायचा.

त्यामुळे प्रविण सर्व नेत्यांचा लाडका बनला होता.

मनसेच्या सर्व नेत्यांसोबत प्रविणचे फोटो आहेत.

प्रविणच्या या आत्महत्येमुळे फक्त मनसैनिकांनाच नाही तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही धक्का बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *